हिंगोली येथे ‘कृषी उत्पादनांचे किंमत जोखीम व्यवस्थापन’वर प्रशिक्षण
हिंगोली, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।मा. बाळासाहेब ठाकरे कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कमॉडिटी मार्केट्स अँड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हेजिंग डेस्क’च्या माध्यमातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ‘वायदे बाजाराद्व
हिंगोली येथे ‘कृषी उत्पादनांचे किंमत जोखीम व्यवस्थापन’वर प्रशिक्षण


हिंगोली, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।मा. बाळासाहेब ठाकरे कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कमॉडिटी मार्केट्स अँड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हेजिंग डेस्क’च्या माध्यमातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ‘वायदे बाजाराद्वारे किंमत जोखीम व्यवस्थापन’ विषयावर एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रशिक्षण सत्रात कमॉडिटी मार्केट तज्ञ श्रीकांत कुवळेकर यांनी शेतकऱ्यांना कमॉडिटी बाजाराचे महत्त्व, फ्युचर्स आणि ऑप्शन्स व्यवहारांचे स्वरूप तसेच हेजिंगच्या माध्यमातून किंमत जोखीम कशी कमी करता येते याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास स्मार्टचे नोडल अधिकारी गोविंद बंटेवाड तसेच चमू उपस्थित होती. सत्रात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि शेतकरी उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले.

महाराष्ट्रभर हेजिंग डेस्कतर्फे आतापर्यंत सात प्रशिक्षण सत्रांद्वारे शेतकरी व शेतकरी उत्पादक संस्थांना किंमत जोखीम व्यवस्थापन विषयक मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच शेतकरी उत्पादक संस्थांना प्रत्यक्ष वायदे बाजारात काम करण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि सल्लागार मदतही पुरविली जात आहे.अधिक माहितीसाठी हेजिंग डेस्कचे प्रतिनिधी गौतम आठवले यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande