विलासराव देशमुख फाऊंडेशनतर्फे महिला उद्योजिका व्हीडीएफ बाजार
लातूर, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)। खास दिवाळीनिमित्त महिलांच्या कर्तृत्वाला नवी दिशा देणारी पर्वणी विलासराव देशमुख फाऊंडेशन,लातूरच्या वतीने ''महिला उद्योजिका व्ही. डी. एफ. बाजार''च्या माध्यमातून दि. १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी उपलब्ध करुन दिली आहे. या दोन द
विलासराव देशमुख फाऊंडेशनतर्फे महिला उद्योजिका व्हीडीएफ बाजार


लातूर, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)। खास दिवाळीनिमित्त महिलांच्या कर्तृत्वाला नवी दिशा देणारी पर्वणी विलासराव देशमुख फाऊंडेशन,लातूरच्या वतीने 'महिला उद्योजिका व्ही. डी. एफ. बाजार'च्या माध्यमातून दि. १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी उपलब्ध करुन दिली आहे. या दोन दिवसांत विशेष सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.

माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने आणि ट्वेंन्टीवन अॅग्री लि.च्या संचालिका सौ. अदितीताई अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून बचत गटातील महिला उद्योजकांना दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मोठी व्यावसायिक संधी उपलब्ध करुन देणारे एक खास व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.त्यांच्या गृह उपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ व हस्तकला यांचे भव्य प्रदर्शन व विक्री दि. १४ व १५ ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे

होणार आहे.

'महिला उद्योजिका व्ही. डी. एफ. बाजार'चा शुभारंभ सोहळा दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे खासदार डॉ. शिवाजी काळगे,डॉ.सविता शिवाजी काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

शुभारंभानंतर सायंकाळी ४ वाजता 'खेळ पैठणीचा', दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.२० वाजता 'जागर लोककलेचा' हे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. 'महिला उद्योजिका व्ही. डी. एफ. बाजार'मध्ये अधिकाधिक महिला बचत गटांनी सहभागी व्हावे.अधिक माहितीसाठी संगीता मोळवणे 9404603669,प्रितम जाधव 8698796900 व गजानन बोयणे 7276313708 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विलासराव देशमुख फाऊंडेशन लातूरच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande