आदिवासी आरक्षणात घुसखोरी खपवून घेणार नाही – आ. विलास तरे
पालघर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।“आदिवासी आरक्षणात कोणाचीही घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही. आरक्षण हा आमचा संविधानिक हक्क आहे, तो कुणाच्या बापाचाही वारसा नाही,” अशा तीव्र शब्दांत आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती, जिल्हा पालघर अध्यक्ष आणि आमदार विलास तरे या
आदिवासी आरक्षणात घुसखोरी खपवून घेणार नाही – आमदार विलास तरे


पालघर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।“आदिवासी आरक्षणात कोणाचीही घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही. आरक्षण हा आमचा संविधानिक हक्क आहे, तो कुणाच्या बापाचाही वारसा नाही,” अशा तीव्र शब्दांत आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती, जिल्हा पालघर अध्यक्ष आणि आमदार विलास तरे यांनी जनसमुदायाला उद्देशून गर्जना केली.

‘आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती’च्या वतीने दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पालघर येथे आयोजित ‘जन आक्रोश विशाल मोर्चा’ मध्ये जिल्हाभरातील लाखो आदिवासी बांधव, महिला, तरुण, विद्यार्थी आणि संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले.

सकाळपासूनच क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक, पालघर चार रस्ता परिसरात पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि घोषणांच्या गजरात जनसमुदाय जमू लागला. “बंजारा-धनगर हटाओ, आदिवासी आरक्षण बचाओ!”, “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं!”, “हम हमारा हक मांगते, किसीसे भिख नहीं मांगते!” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

सांस्कृतिक नृत्य, पारंपरिक पोशाख, झेंडे आणि घोषणांच्या माध्यमातून आदिवासी युवकांनी या आंदोलनाला सांस्कृतिक रंग दिला. काही संघटनांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा 2’ चित्रपटातील शैलीत सादरीकरण करून वातावरण भारावून टाकले.

मोर्चाच्या शेवटी जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात बंजारा आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याच्या हालचालींचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

“हे पाऊल संविधानविरोधी असून आदिवासी समाजाच्या हक्कांवर आघात करणारे आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले.

तसेच “सरकारने अशा असंवैधानिक प्रयत्नांना तात्काळ आळा घालावा,” अशी मागणी समितीने केली.

सभेत आमदार विलास तरे म्हणाले की, “आरक्षण हा आमचा संविधानात दिलेला हक्क आहे. बंजारा आणि धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश हा पूर्णपणे असंवैधानिक आहे. आमच्या आरक्षणावर कुणाचाही डाका चालणार नाही.

सरकारने या घुसखोरीच्या हालचालींना आळा घालावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande