सोलापूर -झेडपी आरक्षणात प्रस्थापितांना धक्का
सोलापूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 गटांसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत अनेक प्रस्थापित नेत्यांना धक्का बसला आहे, तर इतर दिग्गजांना पर्यायी मतदारसंघाचा शोध घ्यावा लागणार आहे. अक्कलकोट तालुक्यातील पान मंगरूळ आणि जेऊर हे दोन
ZP news solpaur


सोलापूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 गटांसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत अनेक प्रस्थापित नेत्यांना धक्का बसला आहे, तर इतर दिग्गजांना पर्यायी मतदारसंघाचा शोध घ्यावा लागणार आहे.

अक्कलकोट तालुक्यातील पान मंगरूळ आणि जेऊर हे दोन जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने त्या ठिकाणी माजी आ.सिद्रामप्पा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांना राजकीय धक्का बसला आहे. आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या काकू माजी जि.प.सदस्य मंगल कल्याणशेट्टी यांचे चप्पळगाव गट पुन्हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहे. माजी जि.प. सदस्य आनंद तानवडे यांचाही वागदरी गट ओबीसी खुला प्रवर्ग आरक्षित झाल्याने त्यांचाही झेडपीत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील माजी जि.प. अध्यक्ष बळीराम साठे यांचा नान्नज गट ओबीसी खुला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने त्यांच्या गटात नाराजी दिसून आली. दारफळ बीबी आणि कोंडी दोन्ही गट सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande