धाराशिव, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। धाराशिवच्या व्यापाऱ्याकडून तुळजाभवानी चरणी ११ किलो चांदीच्या समई अर्पण केली आहे. तुळजापूर येथील कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी धाराशिव येथील एका सराफ व्यापाऱ्याने ११ किलो वजनाच्या दोन भव्य चांदीच्या समई अर्पण केल्या आहेत. देवीवरील अपार श्रद्धेतून त्यांनी ही मौल्यवान भेट दिली आहे.
धाराशिव येथील या देवीभक्त व्यापाऱ्याने भक्तिभावाने या दोन समई देवीसाठी अर्पण केलेल्या. या दोन्ही समईंचे एकूण वजन ११ किलो असून, त्यांची अंदाजे किंमत १६ लाख ७० हजार रुपये इतकी आहे.
या अनमोल भेटीबद्दल श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने संबंधित व्यापाऱ्याचा यथोचित सत्कार करण्यात आला व त्यांचे आभार मानण्यात आले. याप्रसंगी मंदिर संस्थानचे विश्वस्त, अधिकारी, पुजारी आणि इतर भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यापाऱ्याच्या या उदार दातृत्वाने देवीभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis