सैनिक कल्याण विभागात लिपिक टंकलेखक (गट-क) पदांची सरळसेवा भरती
सोलापूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।सैनिक कल्याण विभाग व त्याच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात लिपिक टंकलेखक (गट-क) पदांच्या सरळसेवा भरतीसाठी फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 72 पदे उपलब्ध असून त्यापैकी 0
सैनिक कल्याण विभागात लिपिक टंकलेखक (गट-क) पदांची सरळसेवा भरती


सोलापूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।सैनिक कल्याण विभाग व त्याच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात लिपिक टंकलेखक (गट-क) पदांच्या सरळसेवा भरतीसाठी फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 72 पदे उपलब्ध असून त्यापैकी 01 पद अपंग संवर्गासाठी राखीव आहे. सदर पद दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करून गुणवत्ता व उपलब्धतेनुसार भरले जाणार आहे.

ही भरती प्रक्रियाTCS-iONया संस्थेमार्फत राबविण्यात येणार असून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अर्ज सादर करण्याची मुदत व संकेतस्थळ:

पात्र उमेदवारांनी आपले अर्जwww.mahasainik.maharashtra.gov.inया संकेतस्थळावरResources Tab > Recruitment Tabमध्ये14ऑक्टोबर2025रोजी सकाळी11.00वाजल्यापासून ते05नोव्हेंबर2025रोजी संध्याकाळी23.59वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर वेबलिंक बंद करण्यात येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande