पदवीधर व शिक्षक मतदार संघाची मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर
पुणे, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। मा. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाची मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहिर झाला असून,मतदार नोंदणी प्रक्रिया दिनांक ३०/९/२०२५ पासून सुरु झालेली आहे. पुण
पदवीधर व शिक्षक मतदार संघाची मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर


पुणे, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। मा. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाची मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहिर झाला असून,मतदार नोंदणी प्रक्रिया दिनांक ३०/९/२०२५ पासून सुरु झालेली आहे. पुणे विभागासाठी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,विभागीय आयुक्त,पुणे विभाग पुणे हे मतदार नोंदणी अधिकारी असून,पुणे जिल्ह्यासाठी श्री जितेंद्र डूडी जिल्हाधिकारी पुणे हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आहेत. त्यानुसारपुणे जिल्ह्यामधील २०६ पिंपरी(अ.जा) विधानसभा मतदारसंघात पदवीधर व शिक्षक मतदारांची नोंदणी सुरु झाली असून,त्यासाठी डॉ. हेडगेवार भवन,सेक्टर नं २६,निगडी प्राधिकरण ४११०४४ येथे मतदार नोंदणी कक्ष सुरु करणेत आले आहे अशी माहिती सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी श्रीम. अर्चना यादव यांनी दिली.

मतदार नोंदणीसाठी अर्ज सादर करणेची अंतिम तारीख दिनांक ६/११/२०२५ असून प्रारूप मतदार यादी दिनांक २५/११/२०२५ रोजी व अंतिम मतदार यादी दिनांक ३०/१२/२०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे.

पदवीधर मतदार नोंदणीसाठी नमुना क्रमांक १८ चा फॉर्म व शिक्षक मतदार संघासाठी नमुना क्रमांक १९ चा फॉर्म आहे,त्यासोबत आवश्यक पुराव्याची कागदपत्र जोडून पात्र मतदारांनी दिनांक ६/११/२०२५ पूर्वी समक्ष वा ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे श्रीम. अर्चना यादव यांनी आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande