सोलापूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।
सोलापूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। -भारत निवडणूक आयोगाने दिनांक 01 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक विधानपरिषद मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 30 सप्टेंबर 2025 रोजी मतदार नोंदणी नियम 1960 चे कलम 31(3) व 31(4) अन्वये जाहिर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील सर्व पात्र मतदारांची नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे विभाग यांच्यातर्फे द्वारे कॉन्फरन्स द्वारा बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठक दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता होणार असून, यामध्ये शासकीय अधिकारी, शिक्षण संस्था, वैद्यकीय, विधी, अभियंता, बँका व इतर व्यावसायिक नोंदणीकृत संस्था/संघटना यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील संबंधित विभाग प्रमुखांनी VC बैठकीसाठी दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.15 वाजेपर्यंत नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, VIP कक्ष, सोलापूर येथे उपस्थित राहावे, अशा सूचना संबंधित पत्रान्वये प्राप्त झाल्या आहेत. -
------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड