परभणी, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इमाव, विजाभज व विमा या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिकणा-या विजाभज व विमाप्र मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, सैनिकी शाळेमध्ये प्रशिक्षण घेणा-या विजाभज / विमाप्र विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना, माध्यमिक शाळेत शिकणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रदाने (विजाभज / विमाप्र) योजना, इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकत असणाऱ्या विजाभज/ विमाप्र प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, माध्यमिक शाळेत शिक्षण घेणा-या विजाभज / विमाप्र विद्यार्थ्यांना शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने, इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकत असणा-या इतर मागास प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिकणा-या इतर मागास प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, इयत्ता 1 ली ते 10 वी मध्ये शिकत असणा-या डीएनटी, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती केंद्र पुरस्कृत योजना (केंद्र हिस्सा 60 टक्के व राज्य हिस्सा 40 टक्के) मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात.
या योजना यापूर्वी ऑफलाईन स्वरुपात राबविण्यात येत होत्या. परंतु शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून सदर योजना महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन स्वरुपात राबविण्यात येत आहेत. सदर योजनेअंतर्गत 09 ऑक्टोबर 2025 पर्यंत जिल्ह्यातील पात्र शाळांपैकी 1,452 शाळांनी रजिस्ट्रेशन केलेले असून अद्यापपर्यंत 765 शाळांनी रजिस्ट्रेशन केलेले नसल्याचे दिसून येत आहे. सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग व संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांनी रजिस्ट्रेशन पुर्ण करुन पात्र विद्यार्थ्यांचे 100 टक्के अर्ज महाडिबीटी पोर्टलवर भरण्याबाबत निर्देश दिले आहेत.
त्यानुषंगाने सदर योजनेची प्रभावीपणे अंमलबाजावणी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांनी https://permatric.mahait.org/login/login या महाडिबीटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करुन पात्र विद्यार्थ्यांचे 100 टक्के अर्ज भरुन या कार्यालयाच्या लॉगिनवर फारवर्ड करावेत. उपरोक्त मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत इमाव, विजाभज व विमाप्र या प्रवर्गातील एकही विद्यार्थी सदर योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक रामेश्वर मुंडे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis