ब्रिटनने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतीय कंपनीवर लावले निर्बंध
लंडन, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। रशियन अर्थव्यवस्थेला धक्का देण्यासाठी ब्रिटन सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. ब्रिटनने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या अनेक कंपन्यांवर निर्बंध घातले आहेत, ज्यामध्ये भारताची पेट्रोलियम क्षेत्रातील कंपनी नायरा एनर्जी देखील समाविष्
ब्रिटिश सरकारने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतीय कंपनीवर लावले निर्बंध


लंडन, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। रशियन अर्थव्यवस्थेला धक्का देण्यासाठी ब्रिटन सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. ब्रिटनने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या अनेक कंपन्यांवर निर्बंध घातले आहेत, ज्यामध्ये भारताची पेट्रोलियम क्षेत्रातील कंपनी नायरा एनर्जी देखील समाविष्ट आहे.ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर भारत दौऱ्यावरून परतल्यानंतर लगेचच हा निर्णय घेतला गेला.

ब्रिटन सरकारने नायरा एनर्जी लिमिटेडवर हे निर्बंध यामुळे लावले आहेत, कारण या कंपनीने 2024 मध्ये अब्जावधी डॉलरच्या रशियन कच्च्या तेलाची आयात केली होती. ब्रिटनच्या या पावलाचा उद्देश रशियाकडे पोहोचणारे तेल उत्पन्न थांबवणे हा आहे. रशियन तेलाला जागतिक बाजारातून दूर ठेवून, पुतिन यांच्या युद्धखात्यात जाणारा महसूल रोखणे हे या निर्णयामागचे मुख्य कारण आहे. रशियन तेल खरेदी करणाऱ्या इतर अनेक कंपन्या आणि व्यक्तींवरही ब्रिटनकडून बंदी घालण्यात आली आहे.

नायरा एनर्जीवर यापूर्वी युरोपीय संघाकडूनही बंदी घालण्यात आली होती. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला चार वर्षे होत आली आहेत, परंतु विविध प्रयत्नांनंतरही हे युद्ध संपण्याचे नाव घेत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धात अनेक वेळा संधीसाधू तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे, पण प्रत्येक वेळी चर्चा अपयशी ठरते.अशा परिस्थितीत रशियावर आर्थिक दबाव आणून युद्ध थांबवण्याची रणनीती राबवली जात आहे. युरोपीय देशांसोबत मिळून एक अशी योजना बनवली जात आहे की रशियाशी होणारा ऊर्जा व्यापार बंद करता येईल, जेणेकरून त्याला युद्ध चालवण्यासाठी आवश्यक निधी मिळणार नाही. हाच तो मुद्दा आहे, ज्यामुळे अमेरिका आणि भारत यांच्यात तणाव आहे, तर काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि चीनमध्येही या विषयावर वाद झाला होता.

ब्रिटनने लावलेल्या नवीन निर्बंधांमध्ये थेट रशियन तेल कंपन्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. ज्या कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे, त्यात रोसनेफ्ट आणि लुकोईल यांचा समावेश आहे. या दोन्ही कंपन्या जगातील सर्वात मोठ्या ऊर्जा कंपन्यांपैकी आहेत. रोसनेफ्ट कंपनी ही जगातील एकटीच सुमारे ६ टक्के जागतिक तेल उत्पादनात योगदान देते, तर रशियाच्या एकूण तेल उत्पादनाच्या जवळपास अर्ध्यावर तिचा कब्जा आहे. अशा प्रकारे, ब्रिटनकडून रशियावर आर्थिक दबाव वाढवण्याचे हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande