संयुक्त राष्ट्रसंघामध्ये तात्काळ सुधारणेची गरज – एस. जयशंकर
न्यूयॉर्क, 16 ऑक्टोबर (हिं.स.) : संयुक्त राष्ट्रसंघ 2025 नव्हे तर 1945 मधील जगाच्या वास्तवाचे प्रतिबिंब दर्शवतो. तसेच संयुक्त राष्ट्रसंघात तात्काळ सुधारणेची गरज असल्याचे प्रतिपादन भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी केले. संयुक्त
एस जयशंकर , परराष्ट्र मंत्री


न्यूयॉर्क, 16 ऑक्टोबर (हिं.स.) : संयुक्त राष्ट्रसंघ 2025 नव्हे तर 1945 मधील जगाच्या वास्तवाचे प्रतिबिंब दर्शवतो. तसेच संयुक्त राष्ट्रसंघात तात्काळ सुधारणेची गरज असल्याचे प्रतिपादन भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी केले.

संयुक्त राष्ट्र शांतिसेना योगदान देणाऱ्या देशांच्या प्रमुखांच्या अधिवेशनात (यूएनटीसीसी 2025) आज, गुरुवारी जयशंकर म्हणाले की, भारताचा शांतता स्थापनेचा दृष्टिकोन हा आपल्या सांस्कृतिक मूल्यांमध्ये रुजलेला आहे आणि तो ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वज्ञानाने प्रेरित आहे. शांतीचे रक्षक, निर्माता आणि दूत या रूपात काम करणाऱ्या सैनिक नेतृत्वांच्या या प्रतिष्ठित सभेला संबोधित करणे हे माझ्यासाठी गौरवाचे आहे. तुम्ही अशा संस्थेचे प्रतिनिधित्व करता, जी गेल्या आठ दशकांपासून संघर्षग्रस्त जगासाठी आशेचा किरण ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

जयशंकर यांनी स्पष्ट केलं की, भारताचा शांतता स्थापनेचा दृष्टिकोन असा आहे की, जागतिक सहकार्य हे न्याय, समानता आणि समावेशावर आधारित असावं. “भारत शांतता स्थापनेला आपल्या सांस्कृतिक मूल्यांशी जोडतो. आम्ही संपूर्ण जगाला एक कुटुंब मानतो. हे ‘वसुधैव कुटुंबकम्’ या सनातन तत्त्वात रुजलेलं आहे. हे केवळ सांस्कृतिक विचार नसून, आमच्या संपूर्ण विश्वदृष्टिकोनाचा पाया आहे. म्हणूनच भारत सर्व समाज आणि व्यक्तींसाठी न्याय, सन्मान, संधी आणि समृद्धी यांचं समर्थन करत आला आहे. म्हणूनच आम्ही बहुपक्षीयतेवर आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीवर विश्वास ठेवत असल्याचे जयशंकर यांनी सांगितले.

नवा दृष्टिकोन आवश्यक

आधुनिक जगातल्या आव्हानांविषयी बोलताना जयशंकर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय राजकारणातील स्पर्धात्मकतेच्या पलीकडे जाऊन आपल्या प्रतिसादांची गरज आहे. अशा सहकार्यांचं नैसर्गिक प्रारंभिक केंद्र म्हणजेच संयुक्त राष्ट्र आहे.झाल्यानंतरचे अनुभव शेअर करताना जयशंकर म्हणाले, “आजही संयुक्त राष्ट्र 2025 नव्हे, तर 1945 च्या जगाचं चित्र दाखवतं. सुमारे 80 वर्षं हा कोणत्याही निकषाने खूप मोठा कालखंड आहे आणि या कालावधीत संयुक्त राष्ट्रांची सदस्यसंख्या चौपट झाली आहे.बदलत्या जागतिक वास्तवांशी जुळवून न घेणाऱ्या संस्था कालबाह्य होण्याच्या मार्गावर असतात. ज्या संस्था बदल स्वीकारत नाहीत, त्या केवळ अप्रासंगिकच ठरत नाहीत, तर त्यांच्या वैधतेवरही प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी, अनिश्चिततेच्या काळात आपल्याजवळ कोणताही ठोस आधार राहत नाही, असं परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ठामपणे सांगितले.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande