अमरावती - प्रलंबित वाढीव टप्पे मंजूर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अमरावती, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। शिक्षकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या व मागण्या संदर्भात शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्षव भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक चंद्रशेखर भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालत निवेदन सादर केले. प्रलं
अमरावती - प्रलंबित वाढीव टप्पे मंजूर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


अमरावती, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।

शिक्षकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या व मागण्या संदर्भात शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्षव भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक चंद्रशेखर भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालत निवेदन सादर केले.

प्रलंबित वाढीव टप्पे मंजूर करावेत आणि वेतन आयोगाचे थकीत हप्ते थेट शिक्षकांच्या खात्यात जमाकरावे अशी महत्त्वपूर्ण मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सह-संयोजक चंद्रशेखर भोयर हे वाशिम, यवतमाळ, बुलढाणा आणि जालना जिल्ह्यांतील शिक्षक संवाद दौऱ्यावर असताना असंख्यशिक्षक व शिक्षकेतर बांधवांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.या संवादांमध्ये सैनिकी अंशतः अनुदानित शाळांना सन 2019 पासून प्रलंबित असलेले वाढीवटप्पे तत्काळ मंजूर करावेत तसेच जीपीएफ, एनपीएस, डीसीपीएस खाते नसलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीयांच्या 6 वा व 7 व्या वेतन आयोगाचे थकित हफ्ते थेट त्यांच्या वेतन खात्यात जमा करण्यात यावेत, असे दोन महत्त्वाचे मुद्दे शिक्षकांनी ठळकपणे उपस्थित केले. शिक्षक बांधवांच्या या न्याय्य मागण्यांची तत्काळ दखल घेत चंद्रशेखर भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अधिकृत निवेदनाद्वारे दोन्ही प्रश्नांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केलीतसेचयाप्रत्यक्ष भेटघेऊन संदर्भातील निवेदन सादर केले. या दोन्ही मागण्यांवर संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande