अमरावती - प्रभाग क्रमांक १३ चे नाव अंबापेठ गौरक्षण नमुना घोषित
अमरावती, 16 ऑक्टोबर (हिं.स.) अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रभाग रचनेमध्ये तुषार वानखडे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांनी प्रभाग क्र. १३ अंबापेठ-गौरक्षण या प्रभागाच्या नावामध्ये ''नमुना'' भागाचे
अमरावती - प्रभाग क्रमांक १३ चे नाव अंबापेठ गौरक्षण नमुना घोषित


अमरावती, 16 ऑक्टोबर (हिं.स.)

अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रभाग रचनेमध्ये तुषार वानखडे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांनी प्रभाग क्र. १३ अंबापेठ-गौरक्षण या प्रभागाच्या नावामध्ये 'नमुना' भागाचे नाव समाविष्ट करण्याची मागणी केली होती. त्यांच्या आक्षेपावर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी मांडलेल्या युक्तीवादानुसार अखेर या प्रभागाचे नाव 'अंबापेठ-गौरक्षण-नमुना' असे करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत झालेल्या या सुनावणीत तुषार वानखडे यांनी नमूद केले की, नमुना भागातील नागरिकांना अनेक वर्षांपासून प्रभागाच्या नावात आपल्या भागाचा समावेश व्हावा, अशी अपेक्षा आहे. कारण नमुना भाग हा अमरावती शहरातील ऐतिहासिक गावठाण असून, येथून आजवरसहा नगरसेवक महानगरपालिकेत निवडून गेले आहेत. तसेच हा भाग शहरातील मुख्य बाजारपेठ आणि अमरावतीतील पहिली मॉडेल कॉलनी म्हणूनही ओळखला जातो. यासर्व बाबींचा सविस्तर उल्लेख करीत तुषार वानखडे यांनी प्रभावी मांडणी केली. त्यानंतर त्यांचा आक्षेप ग्राह्य धरत प्रभागाचे नवीन नाव 'अंबापेठ-गौरक्षण-नमुना' असे घोषित केले. या निर्णयामुळे नमुना भागातील नागरिकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.तुषार वानखडे हे सन २०१२ पासून भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठपणे जोडलेले असून, त्यांनी आतापर्यंत अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. ते भाजयुमो अमरावती शहराचे उपाध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चा अमरावती शहराचे उपाध्यक्ष, अंबा मंडळाचे सरचिटणीस, तसेच भाजपा शहर कार्यकारिणीचे सदस्य, बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, आणि अमरावती पदवीधर विधानपरिषद निवडणुकीचे विस्तारक म्हणून कार्यरत राहिले आहेत. तुषार वानखडे यांच्या प्रयत्नांमुळे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande