मनमाड, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।
- लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सगळ्यात मोठा वोटचोरी अर्थात मत चोरीचा आरोप केला व तो आरोप मुख्य निवडणूक आयोग यांना सिद्धही करून दाखवला. यानंतर त्यांनी पुन्हा कशाप्रकारे मत चोरी होत आहे हेही प्रूफ करून दिले. हे प्रकरण अजून प्रलंबित असतानाच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या अनुषंगाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्या. या प्रारुप मतदार याद्यातून सत्ताधारी पक्षात असलेले तसेच विद्यमान राहिलेल्या माजी नगरसेवकांनी जे मतदान आपल्याला पडणार नाही ते मतदान परस्पर बीएलओंना हाताशी धरून इतर प्रभागात शिफ्ट केल्याचे समोर आले असून याशिवाय नाशिक, पुणे, मुंबई, जालना, मालेगाव, धुळे आदी ठिकाणचे मतदान देखील आपल्या प्रभागात समाविष्ट केल्याचे प्रकार समोर आले आहेत यावर अनेक भावी नगरसेवक तसेच माजी नगरसेवक आणि आक्षेप घेतला असून याबाबत उत्तर देताना प्रशासनाची दमछाक होत आहे थोडक्यात मतचोरीचे लोण मनमाड शहरात देखील पसरले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV