ब्ल्यू पँथर्सकडून समाजातील ‘मौल्यवान रत्नांना’ मानाचा मुजरा
रायगड, 19 ऑक्टोबर (हिं.स.) पनवेल तालुक्यातील बौद्ध समाजातील पत्रकार, कलाकार आणि समाजसेवकांचा सन्मान करण्यासाठी ‘ब्ल्यू पँथर्स’ संघटनेतर्फे आयोजित ‘मौल्यवान रत्न पुरस्कार सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्या
Blue Panthers pay tribute to ‘precious gems’ in society


रायगड, 19 ऑक्टोबर (हिं.स.)

पनवेल तालुक्यातील बौद्ध समाजातील पत्रकार, कलाकार आणि समाजसेवकांचा सन्मान करण्यासाठी ‘ब्ल्यू पँथर्स’ संघटनेतर्फे आयोजित ‘मौल्यवान रत्न पुरस्कार सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल अनेक पत्रकारांना गौरविण्यात आले.

कार्यक्रमात पत्रकारिता गटातील ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, देविदास गायकवाड, संतोष आमले, सुभाष वाघपांजे, शंकर वायदंडे, सनिप कलोते, मुनीर तांबोळी, अक्षय कांबळे, गणपत वरगडा आणि श्याम साळवी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. समाजसेवा गटात महेश साळुंखे, राहुल गायकवाड आणि कुणाल लोंढे, तर गायन, कला आणि वादन क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

हा कार्यक्रम रविवारी पनवेल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात झाला. अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ समाजसेवक नरेंद्र गायकवाड उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, विजय गायकवाड, सुनील सोनावणे, तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

“पुरस्कार हे केवळ गौरव नाहीत, ते प्रेरणा आणि दिशादर्शक शक्ती आहेत. पत्रकारिता आणि समाजकार्याचा संगम समाजाला नवचैतन्य देतो,” असे नितीन ठाकरे यांनी सांगितले. या कार्यक्रमात भीम अनुयायांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज सदावर्ते यांनी केले, तर आभार प्रदर्शन कृष्णा गायकवाड यांनी केले. ब्ल्यू पँथर्सच्या सर्व सदस्यांनी या कार्यक्रमासाठी मोठे प्रयत्न केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande