छत्रपती संभाजीनगर, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।
कोल्ही येथे ह.भ.प. अर्जुन महाराज हे वैजापूर येथे गोशाळा चालवतात. भाकड गाईंचा ‘भाकड गाई’ म्हणून उल्लेख न करता त्यांना लक्ष्मी म्हणूया असा प्रचार ते करतात. अशा अनेक लक्ष्मींचा ते वैजापूरच्या कोल्ही गावात सांभाळ केला जातो. त्यांच्या सोबतीला जालिंदर हा मित्र पाणी देण्याचं काम करतो. शिवाय चाळीस एकर शेती असलेला एक शेतकरी हा त्याच्या शेतातील चारा देतो व गाईंना चरायला रान देतो.
शहरातील भूतदयेची आणि दानशूर लोकांची अनेक उदाहरणे दिली जातात, परंतु ग्रामीण भागात गाईंचा सांभाळ करणारे असे अनेक शेतकरी आढळून येतात. मूक प्राण्यांवर प्रेम करत असलेल्या शेतक-यावर आज ओल्या दुष्काळामुळे अत्यंत हलाकीची वेळ का यावी, असा प्रश्न मला पडतो.
मुक्या प्राण्यांवर प्रेम करण्याचा प्रचार खूप मोठ्या प्रमाणावर होतो आणि तो योग्यच आहे. पण शेतकरी तर आपल्यापैकीच एक जीवंत माणूस असतानाही त्याच्यावर आवर्जुन प्रेम व त्याला मदतीचा हात देण्यासाठी लोकं फारसे पुढे येताना दिसत नाहीत.
‘ध्यास ट्रस्ट’च्या माध्यमातून शेतक-यांना शक्य ती मदत करत आहेत.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis