धाराशिव : मंगरूळ आश्रमशाळेच्या परिचर महिलेचे आमरण उपोषण
धाराशिव ,9 ऑक्टोबर (हिं.स.)। तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील संत गाडगे बाबा माध्यमिक (पोस्ट- बेसिक) आश्रमशाळेतील प्रयोगशाळा परिचर राजपुत सुवर्णा दिलीपसिंग यांनी गेल्या अडीच वर्षांपासून थकीत असलेल्या वेतनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपो
अ


धाराशिव ,9 ऑक्टोबर (हिं.स.)। तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील संत गाडगे बाबा माध्यमिक (पोस्ट- बेसिक) आश्रमशाळेतील प्रयोगशाळा परिचर राजपुत सुवर्णा दिलीपसिंग यांनी गेल्या अडीच वर्षांपासून थकीत असलेल्या वेतनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. ऐन दिवाळीत इतर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करूनही केवळ आपल्याला वेतनापासून वंचित ठेवत कुटुंबाला उपाशी ठेवण्याचा प्रकार संबंधित अधिकाऱ्यांनी केला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात राजपुत सुवर्णायांनी म्हटले आहे की, साहेब माझे गेली अडीच वर्षापासुन वेतन थांबले असतांना संबंधितांची दिवाळी आहे म्हणुन वेतन दिले गेले पण मला वेतनापासुन वंचित ठेवले. माझ्या परिवाराला दिवाळीत उपाशी ठेवण्याचे संबंधितांनी ठरविले. 'मला जगण्यासाठी वेतन दया अन्यथा लोकशाही मार्गाने केलेल्या उपोषण दरमयान माझा बळी घ्या', अशा संतप्त भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

त्यांनी २५ सप्टेंबर रोजीच जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना उपोषणाची नोटीस दिली होती. इतर कर्मचाऱ्यांसोबत आपले वेतन देयक सादर न केल्यास आणि इतरांचे वेतन अदा केल्यास, आपण उपोषणास बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. मात्र, जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांनी इतर कर्मचाऱ्यांची बिले मंजूर केली आणि त्यांच्या खात्यावर वेतन जमाही झाले, परंतु राजपुत सुवर्णा यांना पुन्हा डावलण्यात आले.

--------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande