गोदा श्रध्दा फाउंडेशनतर्फे 22 ऑक्टोबर रोजी सांज पाडवा
नाशिक, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। - दिवाळी मध्ये नाशिकच्या नागरिकांना सुरांची मेजवानी देणाऱ्या गोदा श्रध्दा फाउंडेशनच्या सांज पाडवा या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, 22 ऑक्टोबर रोजी सायं.6 ते 10 दरम्यान बॉइज टाऊन स्कुल ग्राऊंड, कॉलेज रोड, नाशिक येथे करण्य
गोदा श्रध्दा फाउंडेशनतर्फे 22 ऑक्टोबर रोजी सांज पाडवा


नाशिक, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।

- दिवाळी मध्ये नाशिकच्या नागरिकांना सुरांची मेजवानी देणाऱ्या गोदा श्रध्दा फाउंडेशनच्या सांज पाडवा या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, 22 ऑक्टोबर रोजी सायं.6 ते 10 दरम्यान बॉइज टाऊन स्कुल ग्राऊंड, कॉलेज रोड, नाशिक येथे करण्यात करण्यात आले आहे. हे या उपक्रमाचे 25 वे वर्ष असून या आधी पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक नामवंत गायकांनी नाशिककरांना सुरांनी मंत्रमुग्ध केले होते.

या वर्षी च्या सांज पाडव्यासाठी इंडियन आयडॉल फेम प्रतिक सोळसे,जगदीश चव्हाण ,श्वेता दांडेकर ,भाग्यश्री टिकले हे आपली गीते सादर करणार असून निवेदन परेश दाभोळकर यांचे असणार आहे.या कार्यक्रमास उपस्थित राहून सणाचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन गोदा श्रध्दा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सुरेश अण्णाजी पाटील व परिवार यांनी केले आहे .

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande