राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ. जीवन राजपूत यांची वर्णी
छत्रपती संभाजीनगर, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महाराष्ट्र प्रदेशध्यक्षपदी डॉ. जीवनसिंग राजपूत यांची नुकतीच निवड करण्यात आली. या निवडीनंतर सर्वसामान्य नागरिकांत चैत्यन्याचे वातावरण पसरले आहे. करणी सेनेच्या माध्यमातून व
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ. जीवन राजपूत यांची वर्णी


छत्रपती संभाजीनगर, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महाराष्ट्र प्रदेशध्यक्षपदी डॉ. जीवनसिंग राजपूत यांची नुकतीच निवड करण्यात आली. या निवडीनंतर सर्वसामान्य नागरिकांत चैत्यन्याचे वातावरण पसरले आहे. करणी सेनेच्या माध्यमातून विद्यार्थी, शेतकरी, महिला आदी समाजघटकांतील प्रत्येकांना न्याय देण्याची जबाबदारी उचलू अशी ग्वाही डॉ. जीवन राजपूत यांनी दिली. ग्रामीण भागात आजही शेतकऱ्यांच्या मुलांना उच्चशिक्षणासाठी अडी अडचर्णा येतात. उच्च शिक्षण असो वा नोकरी व्यवसायासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

देशभरात विस्तार असलेल्या या संघटनेची जबाबदारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुर तालुक्यात बेंदवाडी गावातील डॉ. जीवन राजपूत यांनी दिल्याने सामान्य लोकांना न्याय दिल्याची भावना जनतेत पसरली आहे.

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महाराष्ट्र प्रदेशध्यक्षपदी डॉ. जीवनसिंग राजपूत यांच्या निवडीनंतर शहरासह ग्रामीण भागात शाखा विस्ताराल वेग आला आहे. या शाखेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची कामे करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. वरिष्ठांनी दिलेल्या संधीचे सोने करत शाखाविस्तार व संघटनवाढीस बळ देणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande