परभणीत भाऊबीजेनिमित्त गुरुवारी भेटी लागी जीवा माहेरवाशीणीचा मेळावा
परभणी, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। पुर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथे गुरुवार (२३ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी ७ वाजता भाऊबीजनिमित्त भेटी लागी जीवा माहेरवाशीणींचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. प्रगतशील महिला शेतकरी जिजामाता कृषीभुषण पुरस्कार प्राप्त मेघात
परभणीत भाऊबीजेनिमित्त गुरुवारी भेटी लागी जीवा माहेरवाशीणीचा मेळावा


परभणी, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। पुर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथे गुरुवार (२३ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी ७ वाजता भाऊबीजनिमित्त भेटी लागी जीवा माहेरवाशीणींचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. प्रगतशील महिला शेतकरी जिजामाता कृषीभुषण पुरस्कार प्राप्त मेघाताई देशमुख ह्या कृषीविषयक तर डॉ. सायली दुधाटे- शिंदे ह्या महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करणार आहेत.

त्याच प्रमाणे बालाजी गरड प्रस्तुत भक्तीमय गीतांचा अनमोल ठेवा हा स्वरसंध्या कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. ललिताबाई कांबळे ह्या राहतील. देऊळगाव दुधाटे व पंचक्रोशीत प्रथमच होत असलेल्या या माहेरवाशीणींच्या मेळाव्यासाठी देऊळगाव दुधाटे व पंचक्रोशीत महिला, नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन देऊळगाव दुधाटे येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande