छत्रपती संभाजीनगर, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगर शहर आणि जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. नेते अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
संभाजीनगर पूर्व ग्रामीण, पश्चिम ग्रामीण, रत्नपूर, फुलंब्री, पैठण, गंगापुर, वैजापूर, कन्नड व सिल्लोड सोयगाव तालुक्यातील शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवन येथे बैठका संपन्न झाल्या.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा यावेळी केली. याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व अनिल चोरडिया उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी या बैठका होत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis