छत्रपती संभाजीनगर, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ संचलित विहंग विशेष मुलांची शाळा आयोजित पालक मेळावा संपन्न झाला . राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यावेळी उपस्थित होते.याच कार्यक्रमात 'तिची वेगळी पाऊलवाट' या विशेष नाटकाचा सुंदर कार्यक्रम संपन्न झाला.या माध्यमातून विशेष मुलांच्या संवेदनशील जगाची ओळख, त्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन आणि पालकांना आधार देण्याचा उत्तम प्रयत्न करण्यात आला.. अशा कार्यक्रमातून समाजात संवेदना आणि सहकार्याची भावना अधिक दृढ होते, असे मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis