छत्रपती संभाजीनगर, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरातील तेली गल्ली तसेच स्नेहनगर भागात नव्याने बसविण्यात आलेल्या विद्युत रोहित्राचे लोकार्पण करण्यात आले. गेल्या अनेक महिन्यापासून नागरिकांची विद्युत रोहित्रासाठी मागणी होत होती. याची दखल आमदार अब्दुल सत्तार यांनी घेतली.
आमदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड शहरात विद्युत व्यवस्थेचे अधिक बळकटीकरण करण्यात येत आहे. पूर्वी असलेल्या रोहित्रावर होणारा भार कमी करण्यासाठी या ठिकाणी अतिरिक्त रोहित्रे बसविण्यात आले आहेत. नवीन रोहित्रे मुळे या भागातील नागरिकांना आता सुरळीत वीज पुरवठा होणार आहे. तेली गल्ली व स्नेहनगर या भागातील विजेचा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis