अकोला - दुकाने २४ तास सुरू ठेवण्याच्या निर्णयाबद्दल भाजपकडून स्वागत
अकोला, 2 ऑक्टोबर (हिं.स.)महायुती सरकारने महाराष्ट्र राज्यातील सर्व दुकाने व आस्थापने (दारू विकणारी ठिकाणे वगळून) २४ तास सुरू ठेवण्यास परवानगी दिल्यानंतर या निर्णयाचे स्वागत संपूर्ण व्यापारी, ग्राहक तसेच सर्व क्षेत्रातील वर्गाकडून होत असून आर्थिक व्य
अकोला - दुकाने २४ तास सुरू ठेवण्याच्या निर्णयाबद्दल  भाजपकडून स्वागत


अकोला, 2 ऑक्टोबर (हिं.स.)महायुती सरकारने महाराष्ट्र राज्यातील सर्व दुकाने व आस्थापने (दारू विकणारी ठिकाणे वगळून) २४ तास सुरू ठेवण्यास परवानगी दिल्यानंतर या निर्णयाचे स्वागत संपूर्ण व्यापारी, ग्राहक तसेच सर्व क्षेत्रातील वर्गाकडून होत असून आर्थिक व्यवस्था सोबत रोजगाराच्या संधी व ग्राहकाला मागेल तेव्हा वस्तू मिळण्याची सोय झाली आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस 14 कोटी महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी सातत्याने. कार्यरत असून समाजातील सर्व घटकांचा विचार करून सामाजिक दायित्व म्हणून कार्य करत आहे. या निर्णयाचा भारतीय जनता पक्ष अकोला जिल्हा भाजपाने स्वागत केले आहे. भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी महायुती सरकारचे आभार व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, नामदार अजितदादा पवार व समस्त मंत्रिमंडळाने आजच्या या बैठकीत ऐतिहासिक निर्णय घेऊन महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी कार्य करत आहे ग्राहक आणि विक्रेता दुकानदार यांनाही सुविधा उपलब्ध झाली आहे. या निर्णयामुळे रोजगार सोबत व्यापार झालेला वेळ मिळणार असून बँकिंग आणि आर्थिक क्षेत्राला बळकटी मिळणार मिळणार आहे.

या निर्णयामुळे सर्व समाजातील घटकांना लाभ मिळणार असून सण वार च्या काळामध्ये या धावपळीच्या काळामध्ये स्वदेशी वस्तूचा प्रचार व ऑनलाईन मुळे विदेशीच वस्तूंच्या वापर वाढत होता परंतु स्थानिक रोजगारासाठी आणि व्यापारासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी सांगून महाराष्ट्र तमाम जनतेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस देवा भाऊ व समस्त मंत्री मंडळाचे आभार व्यक्त केले आहे. राज्याचे कामगार मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी शेतकरी तसेच व्यापारी ग्राहक कामगार यांच्या हिताचा निर्णय असून शासन कायदा सुव्यवस्था आहे त्याच्या दृष्टीने सुद्धा या संदर्भात निर्णय घेणार असून शासनाच्या या निर्णयाचे व राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचे स्वागत केले आहे.

आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल संतोष शिवरकर जयंत मसने, विजय अग्रवाल योगेश गोतमारे, जयश्री ताई पुंडकर, वैशालीताई शेळके सुमनताई गावंडे चंदाताई शर्मा, कुसुमताई भगत, पवन महल्ले, माधव मानकर अंबादास उमाळे राजेश नागमते ऍडव्होकेट रूपाली काकड अडवोकेट देवाशिष काकड रमेश अलकरी आम्रपाली उपरवट, संजय गोटफोडे यांनी ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल आभार मानले आहेत. व्यापारी वर्ग व ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. भाजप नेत्यांनी असेही म्हटले की या निर्णयामुळे रोजगाराच्या संधी वाढतील, व्यापाराला चालना मिळेल आणि ग्राहकांना चौवीस तास सेवा मिळू शकेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande