भाजप खा. कराड यांच्या उपस्थितीत जीएसटी विषयक विविध बाबींवर सविस्तर चर्चा
छत्रपती संभाजीनगर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा ऑटोमोबाईल्स डीलर्स असोसिएशन पदाधिकाऱ्यांची भारतीय जनता पार्टी आयोजित NEXT GEN GST REFORM या अभियानांतर्गत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भारतीय जनता पक्षाचे खासदार भागवत कराड
अ


छत्रपती संभाजीनगर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा ऑटोमोबाईल्स डीलर्स असोसिएशन पदाधिकाऱ्यांची भारतीय जनता पार्टी आयोजित NEXT GEN GST REFORM या अभियानांतर्गत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

भारतीय जनता पक्षाचे खासदार भागवत कराड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला आहे

जीएसटी विषयक विविध बाबींवर सविस्तर चर्चा झाली तसेच उद्योगक्षेत्रातील अडचणी व त्यावरील उपाय यावर विचारमंथन करण्यात आले.

याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष श्री.किशोर शितोळे, डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री.राहुल मिश्रीकोट, श्री.राहुल पगारीया, श्री.अर्जुसिंह मानसिंग पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डीलर्स असोसिएशनच्या वतीने भारताचे यशस्वी नेतृत्व करणारे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री सौ.निर्मला सितारामन यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.

उद्योजक, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा या हेतूने राबविण्यात आलेल्या या अभियानाला निश्चितच सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande