लातूर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अकरा वर्षांपासून फक्त देश आणि देशाचाच विचार करून कार्य केले असून आपणही आपल्या दैनंदिन जीवनात देशाला प्राधान्य देत काम केले पाहिजे, असे प्रतिपादन जगप्रसिद्ध नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी “राष्ट्र प्रथम” या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत लातूर शहर जिल्हा भाजपच्या वतीने बुद्धिजीवी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी बोलताना लहाने म्हणाले,
सीमांचे संरक्षण करणे हेच राष्ट्र प्रथम नाही तर गोरगरीब आणि गरजू जनतेला मदत करणे हेदेखील राष्ट्रप्रथम आहे.
मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त पाच लाख नागरिकांची नेत्र तपासणी, चष्मे वाटप आणि 51,000 जणांची मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे, ही सेवा खऱ्या अर्थाने राष्ट्रप्रथमाची जाणीव करून देणारी आहे.
या कार्यक्रमाला आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह लातूर शहरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis