लातूर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)। श्री गुरु हावगीस्वामी मठाचे मठाधिश डाॅ.शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांना रंभापुरी जगदगुरु श्री श्री श्री 1008 डाॅ. विरसोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते वीरशैव तत्व प्रबोधक पुरस्कार प्रदान करण्यात आले.
बसवकल्याण जिल्हा बिदर कर्नाटक येथे नवरात्र महोत्सव व दसरा महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री गुरु हावगीस्वामी मठ डोणगाव, उदगीर, रंड्याळ,पडसावळी मठाचे मठाधिश श्री श्री 108 डाॅ.शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांनी कर्नाटक महाराष्ट्र आंध्र व तेलंगणा राज्यात महाराजांचा मोठ्या प्रमाणात शिष्यगण असल्याने वीरशैव तत्वचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्या त्यांनी केल्याबद्दल रंभापुरी पीठाचे जगदगुरु वीर सिहासनाधिश्वर श्री श्री श्री 1008 जगदगुरु प्रसन्न रेणूक डाॅ वीरसोमेश्वर राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले .
यावेळी कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री एस.आर.बोमांई, कर्नाटकचे वैद्दकीय मंत्री प्रकाश पाटिल,माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुब्बा,माजी आ.प्रकाश खंड्रे यांच्या सह तडोळा, हरकुड, तडवळ, राजेश्वर,उटगी,अक्कलकोट जेवळी, हिरेनगाव,अणदूर, बेलकुंदा,आळंद, ईत्यादी मठाचे शिवाचार्य महाराज उपस्थित होते.
डाॅ शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांनी श्री गुरु हावगीस्वामी मठ डोणगाव ,उदगीर ,रंड्याळ,पडसावळी मठाचे मठाधिश म्हणून पट्टाभिषेक घेतल्यानंतर विरशैव लिंगायत समाजात विरशैव तत्व प्रचार आणी प्रसारात त्यांचे खुप मोठे योगदान आहे. कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा व आंध्र या राज्याच्या सिमाभागात विरशैव तत्वज्ञानाच्या प्रबोधनाचे काम अखंडपणे चालू आहे.महाराज नेहमीच विविध मठांचे शिवाचार्य महाराज व भक्तांना सोबत घेऊन देशातील व विदेशातील धार्मिक स्थळांना जाऊन तेथेही महाराजांनी प्रबोधनाची ज्योत तेवत ठेवली आहे.शंभुलिंग शिवाचार्य महाराजांच्या सामाजिक धार्मिक व राष्ट्रिय कार्याची दखल घेऊन जगदगुरुंच्या शुभ हस्ते गौरवण्यात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis