लातूर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)।दुबई येथे होत असलेल्या मास्टर्स लीग व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी लातूर मधील श्री महेश पाळणे यांची भारतीय संघात निवड झाली आहे. दुबई येथे 18 ते 23 ऑक्टोबर 2025 दरम्यान होत असलेल्या मास्टर्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतासह स्पेन,पोलंड, युयेई, फिलिपाईन्स, नेपाळ व युरोपियन युनियन संघाचा समावेश असणार आहे.
श्री महेश पाळणे यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली निवड ही लातूरकरांसाठी आनंदाची बाब असून स्पर्धेतील विजयासाठी त्यांना लातूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शुभेच्छा दिल्या आहेत
.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis