लातूर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)।मानसी प्रोडक्शन्स निर्मित 'वॉयसेस ऑफ वूमन इन उदगीर' या माहितीपटाचे आज डॉ भाग्यश्री घाळे यांच्यातर्फे उदयगिरी लॉयन्स सभागृहात सादरीकरण करण्यात आले.लातूर जिल्ह्यातील बैलांच्या संदर्भामध्ये हा माहितीपट तयार करण्यात आला आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागातील महिलांच्या कार्यपद्धतीवर यावर कटाक्ष टाकण्यात आला आहे
डायरेक्टर कृष्णा काकरे व त्यांच्या टिमनी स्त्री शिक्षण व अभिव्यक्ती हा विषय घेऊन समाजातील वेगवेगळ्या घटकांतील महिलांसोबत हा माहितीपट बनविला आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बिभीषण मद्देवाड,विश्वशींती शिक्षण संस्थेचे प्रा डॉ विरभद्र घाळे व प्रा प्रेमलता घाळे,ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्त्या विमल गर्जे, ॲड उमादेवी हळ्ळीकर,ॲड सौ सुजाता भोसले, शिवसेनेच्या अरुणाताई लेंढाणे,प्रा विजयकुमार पाटील,रविंद्र हसरगुंडे ,प्रभावती हळ्ळीकर हे उपस्थीत होते.
-------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis