छत्रपती संभाजीनगर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीजच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या गृह उद्योगाचे प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे उद्घाटन फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
कंपनी येथे महिला गृह उद्योगांचे प्रदर्शन तसेच विक्री मेळावा ही संपन्न झाला.. विशेष म्हणजे अधिकारी आणि पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते
हस्तकलेच्या माध्यमातून निर्मित उत्पादने व स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी यंदा देशभर स्वदेशी खरेदी-विक्रीवर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अधिक महत्त्वपूर्ण ठरणार आहे..
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष गौरी निराथिक, आयोजक श्री.अर्जुन गायकवाड, सौ.सारिका किद्रक, सौ.पायल नाईकवाड, उद्योजक माता-भगिनी आणि नागरिकांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis