राष्ट्रीय नेमबाज खेळाडूला काँग्रेस खासदारांची मदत
छत्रपती संभाजीनगर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।बदनापूर तालुक्यातील माळेगाव येथील मोहिनी संजय कातुरे ही एक प्रतिभावान तरुणी राष्ट्रीय नेमबाज खेळाडू म्हणून झळकत आहे कौटुंबिक अडचणींमुळे सरावासाठी लागणारे साहित्य उपलब्ध न झाल्याने तिच्या प्रगतीपुढे अडथळे नि
अ


छत्रपती संभाजीनगर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।बदनापूर तालुक्यातील माळेगाव येथील मोहिनी संजय कातुरे ही एक प्रतिभावान तरुणी राष्ट्रीय नेमबाज खेळाडू म्हणून झळकत आहे

कौटुंबिक अडचणींमुळे सरावासाठी लागणारे साहित्य उपलब्ध न झाल्याने तिच्या प्रगतीपुढे अडथळे निर्माण होत होते. ही परिस्थिती ओळखून छत्रपती संभाजी नगर येथील काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी व कार्यालयाने तिला आवश्यक ती मदत केली. मोहिनीने ते साहित्य खरेदी करून कार्यालयात भेट दिली. गाव गाड्यातील एखाद्या शेतकऱ्याची मुलगी इतकं धाडस करत स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करते, हे खरंच अभिमानास्पद आहे. असे खासदार काळे यांनी सांगितले.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande