परभणी : आ.डॉ.राहुल पाटील यांनी साजरी केली दिव्यांगासोबत दिवाळी
परभणी, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। आमदार डॉ. राहुल पाटील यांनी एमआयडीसी भागातील दिव्यांग शाळेत दिव्यांग बांधवासोबत दिवाळी साजरा करत अनोखा संदेश दिला.यावेळी दिव्यांग बांधवांना विविध प्रकारचे फराळाचे साहित्य, कपडे देण्यात आले. आमदार डॉ.पाटील यांच्या
आ.डॉ.राहुल पाटील यांनी साजरी केली दिव्यांगासोबत दिवाळी


परभणी, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। आमदार डॉ. राहुल पाटील यांनी एमआयडीसी भागातील दिव्यांग शाळेत दिव्यांग बांधवासोबत दिवाळी साजरा करत अनोखा संदेश दिला.यावेळी दिव्यांग बांधवांना विविध प्रकारचे फराळाचे साहित्य, कपडे देण्यात आले.

आमदार डॉ.पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत .याचाच एक भाग म्हणून एमआयडीसी परिसरातील दिव्यांग शाळेत दिव्यांग बांधवांसमवेत आमदार डॉ.पाटील यांनी दिवाळी साजरी केली.यावेळी व्यासपीठावर डॉ. विवेक नावंदर, ज्ञानेश्वर पवार,बाळराजे तळेकर, नवनीत पाचपोर,संभानाथ काळे,उद्धव मोहिते, अजित यादव,बंडू बिडकर प्रकाश जाधव,उपस्थित होते.

या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना व दिव्यांग बांधवांना नवीन कपडे, फराळ, खेळणी, शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, या निमित्ताने दिव्यांग बांधवांना आपण आनंद देऊ शकलो. दिव्यांगांच्या प्रश्नावर आपण काम करत आहोत. याआधी देखील परभणीत दिव्यांगासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. दिव्यांगांना कृत्रिम हात,पाय, ट्रायसायकल वाटप करण्यात आले. यापुढे देखील दिव्यांगांच्या प्रश्नावर काम करणार असल्याचे सांगितले. ज्यांना मायेची,प्रेमाची गरज आहे अशा ठिकाणी वाढदिवस कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आमदार पाटील यांनी कौतुक केले.यावेळी आयोजक अजय चव्हाण,विष्णू वैरागड, विलास राठोड,सुभाष मोरे, रितश लासे, ज्ञानेश्वर राठोड, महेंद्र फुटाणे,भोसले आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande