अमरावती, 20 ऑक्टोबर (हिं.स.)
कुऱ्हा तालुका तिवसा येथे शेतकरी न्याय हक्क विचार मंचाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दिनेश वानखडे यांचे मार्गदर्शनात शेतकरी संवाद बैठक घेण्यात आली. या शेतकरी सभेत बियाणे लागवड बाबत चर्चा करण्यात आली. भेसळ युक्त बियाणे, निकष दर्जाचे फवारणी औषध, सोबतच तण न मरणारे तणनाशक याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सरकारच्या महाडीबीटी वर असलेल्या योजना बाबत नेहमी सर्व्हर डाउन कार्यक्रम बाबत मुद्दे मांडण्यात आले. त्यानंतर शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी याबाबत काही शेतकरी बांधवांनी माहिती दिली. तसेच या बैठकीमध्ये प्रामुख्याने यावर्षी अतिवृष्टी, महापूर व सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून सरकारने दिलेली मदत तुटपुंजी जाहीर करून शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टा करत आहे. सरसकट अनुदान देऊन शेतकरी बांधवाच्या खात्यावर फक्त ७ हजार रुपये येत आहे. सरकारने काढलेल्या सत्य आणि असत्य सरकारी जी.आर. चे वाचन करून चर्चा करण्यात आली. जी.आर प्रमाणे मिळणारी मदत तुटपुंजी असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने हेक्टरी जिरायती शेती करता पन्नास हजार रुपये व बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार रुपये ही किमान मदत मिळायला पाहिजे होती याबाबत शेतकरी न्याय हक्क विचार मंचाच्या वतीने अनेकदा निवेदन व आंदोलन करण्यात आले .तरीसुद्धा सरकारने तुटपुंजी मदत दिल्याने तहसीलदार साहेब तिवसा यांना निवेदन देऊन काही दिवसांच्या आत जर का या प्रकारची मदत मिळाली नाही तर शेतकरी न्याय हक्क विचार मंच आंदोलन करेल अशा प्रकारचा निर्णय संवाद बैठकीमध्ये घेण्यात आला. या बैठकीला शेतकरी न्याय हक्क विचार मंचाचे अध्यक्ष दिनेश वानखेडे, दिलीपसिंह नहाटे, संत्रा उत्पादक महासंघाचे तालुका अध्यक्ष सोपानरावजी जीरापुरे, न्याय हक्क विचार मंचाचे समन्वयक संजय टेकाळे, समन्वयक संजय मोरे, अशोकराव पाटील, विनोद जाधव, नंदूभाऊ जीरापुरे, प्रकाश बडकस, तुकाराम चव्हाण, सभेचे अध्यक्ष श्री गजानन सुने, गजानन ठोंबरे, संतोष भैसे, गजानन दारोकार, नंदू जीरापुरे, राजुभाऊ बाभूळकर, राजेश बिंड, स्वप्नील पवार, पत्रकार नितीन पवार, धर्मेंद्र कुरळकर, सतीश डहाके, अशोक दरणे, नितीन वरठी, उमेश दारोकार, संजय दारोकार, चंद्रकांत माहुले, पुंडलिक दारोकार, प्रमोद दारोकार, प्रदीप दमाये, आशिष बंगरे, किरण बंगरे, गणेश चिरडे, इतर शेतकरी उपस्थित होते. सेंद्रिय शेती अभ्यासक निखिल तेटू यांनी शेतकऱ्यांच्या पिकाची उत्पादनक्षमता कशी वाढावी याबद्दल मार्गदर्शन करून आभार प्रदर्शन केले. या बैठकीच आयोजन अशोक दरणे, सतीश डहाके, प्रदीप भाऊ ठोंबरे, दिनेश बाखडे यांनी यशस्वी केले. या शेतकरी संवाद बैठकीला शेकडोच्या संख्येने बुद्धिजीवी शेतकरी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी