गोंदिया, २० ऑक्टोबर (हिं.स.) : माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ८५ वर्षांचे होते. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कार्यकाळात जलसंपदा मंत्री आणि वित्तमंत्री कारभार सांभाळला आहे. जनसंघापासून ते भाजपाचे ज्येष्ठ नेते असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांच्या निधनाच्या घटनेने कुटुंबियांसह राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
माजी वित्तमंत्री, माजी खासदार शिवणकर यांचे आज (20 ऑक्टोबर) सकाळी 8 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. शिवनकर हे आमगाव विधानसभेचे 5 वेळा आमदार आणि चिमूर लोकसभेचे एक वेळा खासदार राहिले आहेत. तसेच गोंदिया जिल्हा निर्मितीत त्यांचे मोठे योगदान होते.
राजकीय प्रवास
- माजी मंत्री महादेवराव शिवनकर हे आमदार विधानसभेचे पाच वेळा आमदार राहिले आहेत. 1978,1980,1985, 1995,1999
- 1995 ते 1997 मध्ये मनोहर जोशी मंत्रिमंडळात जलसंपदा मंत्री.
- 1997 ते 1999 मध्ये मनोहर जोशी मंत्रिमंडळामध्ये वित्तमंत्री.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी