खडकवासला मतदार संघात शिक्षक, पदवीधर मतदार नोंदणीला सुरुवात
पुणे, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, खडकवासलाज विधानसभा मतदार संघातील पात्र शिक्षक आणि पदवीधर नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवण्यासाठी आपली नावे मतदार यादीत नोंदव
खडकवासला मतदार संघात शिक्षक, पदवीधर मतदार नोंदणीला सुरुवात


पुणे, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।

पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, खडकवासलाज विधानसभा मतदार संघातील पात्र शिक्षक आणि पदवीधर नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवण्यासाठी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ.यशवंत माने आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार किरण सुरवसे यांनी केले आहे.शिक्षक मतदार संघासाठी फॉर्म क्रमांक १९ आणि पदवीधर मतदार संघासाठी फॉर्म क्रमांक १८ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिक्षक मतदार संघातील पात्रतेच्या अटीप्रमाणे, अर्जदाराने १ नोव्हेंबर २०२५ पूर्वीच्या सहा वर्षांपैकी किमान तीन वर्षे माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेत अध्यापन केलेले असणे आवश्यक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande