पुणे, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।
लक्ष्मीपूजनानिमित्त पुणे मेट्रो प्रशासनाने मेट्रो सेवेत तात्पुरता बदल केला आहे. मंगळवारी (ता. २१) मेट्रो सेवा सकाळी सहा वाजता सुरू होऊन सायंकाळी सहा वाजेपर्यंतच चालणार आहे. त्यानंतर सायंकाळी सहा ते रात्री ११ या वेळेत मेट्रो सेवा बंद राहील. मात्र, बुधवारपासून (ता. २२) मेट्रोची सेवा नेहमीप्रमाणे सकाळी सहा ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहील, अशी माहिती मेट्रो प्रशासनाने दिली. नागरिकांनी बदललेल्या वेळेची नोंद घ्यावी, असे आवाहन पुणे मेट्रोतर्फे करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु