सोलापूर - मंगळवेढा नगरपालिका निवडणूक प्रारूप मतदार यादीवर 1670 हरकती
सोलापूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दहा प्रभागातून नमुन्यात तब्बल 1670 तक्रारी प्राप्त झाल्या. याशिवाय ब नमुन्यातील तक्रारीची संख्या देखील मोठी आहे, त्यामुळे दिवाळीत नगरपाल
सोलापूर - मंगळवेढा नगरपालिका निवडणूक प्रारूप मतदार यादीवर 1670 हरकती


सोलापूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दहा प्रभागातून नमुन्यात तब्बल 1670 तक्रारी प्राप्त झाल्या. याशिवाय ब नमुन्यातील तक्रारीची संख्या देखील मोठी आहे, त्यामुळे दिवाळीत नगरपालिकेत कर्मचाऱ्यांना मतदाराची मोहीमच राबवावी लागणार आहे.

नगरपालिका निवडणुकीसाठी यंदा नव्याने प्रभाग निश्चित करण्यात आली असून तब्बल 10 प्रभागातून 20 नगरसेवक निवडले जाणार आहेत त्यामध्ये विधानसभेसाठी निश्चित करण्यात आलेल्या मतदार यादीतील चोखामेळा नगर व दामाजी नगर हद्दीतील मतदार संख्या कमी करून दहा प्रभागात तब्बल 28 हजार 736 इतकी मतदार संख्या निश्चित करण्यात आली. त्यामध्ये दोन दिवसांपूर्वी काँग्रेसने 2539 नावे दुबार असल्याची तक्रार प्रांतअधिकारी यांच्याकडे केली. याशिवाय काही मतदाराचे नावे दुसऱ्या प्रभागात जाणे व काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त मतदार संख्या वाढवून तो प्रभाग जास्त मतदाराचा केला या कारणावरून या हरकती दाखल करण्यात आल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande