गेवराईतील छोट्याशा गावचा लक्ष्मण चव्हाण यशस्वी उद्योजक, स्वतःचे मोठे कार्यालय स्थापन
छत्रपती संभाजीनगर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथे बीड बायपास रोडवरती गुळज ता. गेवराई जि. बीड येथील छोट्याशा गावातून आलेल्या लक्ष्मण चव्हाण या युवकाने प्रयत्नांची पराकाष्ठा करत एलआयसी एजंटच्या माध्यमातून आज एक यशस्वी उद्योजक म्हणून
अ


छत्रपती संभाजीनगर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर येथे बीड बायपास रोडवरती गुळज ता. गेवराई जि. बीड येथील छोट्याशा गावातून आलेल्या लक्ष्मण चव्हाण या युवकाने प्रयत्नांची पराकाष्ठा करत एलआयसी एजंटच्या माध्यमातून आज एक यशस्वी उद्योजक म्हणून स्वतःचे मोठे कार्यालय स्थापन केले. त्याचा उद्घाटन सोहळा पालकमंत्री संजय शिरसाट, खा. संदिपान भुमरे, माजी आ. अमरसिंह पंडित इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

रडत पडत न बसता जिद्दीने चिकाटीने प्रयत्न केल्यास यश मिळते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लक्ष्मण चव्हाण होय. तेव्हा मराठी युवकांनी नोकरीच्या मागे न लागता मिळेल ते पडेल ते काम करून, स्वतःच्या पायावरती उभे राहावे असे आवाहन यावेळी शुभेच्छा देताना केले.

यावेळी गुळज तसेच गेवराई, बीड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने ग्रामस्थ तसेच एलआयसीचे वरिष्ठ अधिकारी या सोहळ्यास उपस्थित होते. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा राष्ट्रवादी शिक्षक संघाचे श्री प्रदीप विखे , श्री एम एम खुटे सर, श्री नितीन कवडे, श्री राजकुमार जाधव,श्री बंडू लांडे व परिवार यावेळी उपस्थित होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande