सोलापूरमध्ये खरडून गेलेल्या जमिनींचे दिवाळीनंतर पंचनामे
सोलापूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये आलेल्या महापुराने नदीकाठच्या जमिनी खरडून निघाल्या आहेत. शेतकऱ्यांची जमीनच वाहून गेल्याने, हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने मदत करण्याचे जाहीर केले आहे. ही मदत देण्यासाठी दिवाळीनंतर
सोलापूरमध्ये खरडून गेलेल्या जमिनींचे दिवाळीनंतर पंचनामे


सोलापूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये आलेल्या महापुराने नदीकाठच्या जमिनी खरडून निघाल्या आहेत. शेतकऱ्यांची जमीनच वाहून गेल्याने, हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने मदत करण्याचे जाहीर केले आहे. ही मदत देण्यासाठी दिवाळीनंतर महसूल प्रशासनाच्या वतीने पंचनामे सुरू केले जाणार आहेत. या पंचनाम्यांसाठी महसूलची यंत्रणा बाधित शेतांची पाहणी करणार आहे.

राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत (खरीप हंगाम) अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकाचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घर पडझड, घरातील वस्तू/साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज दिले आहे. या पॅकेजमध्ये मदतीचे विविध टप्पे पाडले आहेत. घरात पाणी शिरल्याने बाधित झालेल्या तातडीने मदत देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande