अमरावती जि. प.चे ३२ विद्यार्थी विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र, मुलींचा सहभाग लक्षणीय
अमरावती, 20 ऑक्टोबर (हिं.स.) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, नांदगाव पेठ येथील विद्यार्थ्यांनी दमद
अभिमानस्पद;जिल्हा परिषदेचे ३२ विद्यार्थी विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र  मुलींचे सहभाग लक्षणीय


अमरावती, 20 ऑक्टोबर (हिं.स.)

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, नांदगाव पेठ येथील विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत विविध खेळप्रकारात ३२ पेक्षा अधिक विद्यार्थी विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. यवतमाळ आणि वाशीम येथे होणाऱ्या या विभागीय स्पर्धांमध्ये हे विद्यार्थी अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. १४ ते १९ वयोगटातील मुला-मुलींसाठी आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये धावण्याच्या (१००, २००, ४००, १५०० मीटर व ६ किमी), लॉंग जंप, हर्डल्स, गोळाफेक, रिले रेस, कबड्डी (मुली), बुद्धिबळ, कॅरम आणि कुस्ती अशा विविध खेळांमध्ये नांदगाव पेठ शाळेच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करून विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे या सर्व स्पर्धांमध्ये मुलींनी लक्षणीय वर्चस्व गाजवले असून त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.शाळेच्या या भव्य यशाबद्दल बोलताना प्राचार्य देवेंद्र ठाकरे म्हणाले की, विद्यार्थ्यांचे हे यश मेहनत, शिस्त आणि शिक्षक-पालकांच्या अखंड पाठबळाचे फलित आहे. विभागीय स्तरावरही आमचे विद्यार्थी चमकदार कामगिरी करून राज्यस्तरावर झेप घेतील, असा विश्वास आहे. या विजयानंतर संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून उपप्राचार्य सुनील राऊत, क्रीडा मार्गदर्शक गजानन राणे यांच्यासह शिक्षक अशोक चाफले, ए. एस. बनसोडे, के. जे. शेख,रामकृष्ण उपरीकर, संजय डांगे, व्ही. एम. गुरव, प्रणाली ढोणे, जे. टी. आझडे, कल्पना वर्हेकर, माया बागडे, देवपल ब्राम्हण, यु. एस. घारड, डॉ. जयश्री इंगळे, ज्योती नारखेडे, आसीया शेख, चंदा इंगळे, स्वाती बोडाखे, प्रशांत वाडीकर, हेमंतकुमार यावले, जीवनमाला बोरकर, शितल अटाळकर, नितीन फाळके, नीरज दारोकर, उद्धव पांढरीकर, तेजस्विनी शेंडे, धनंजय देशमुख, प्रतिभा भुले, उमेश केने यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande