अमरावतीतील शुभम तिप्पट यांची असिस्टंट जिओलॉजिस्ट पदासाठी निवड
अमरावती, 20 ऑक्टोबर (हिं.स.) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासनाच्या ग्राउंड वॉटर सर्व्हे अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सी (जीएसडीए) येथे शुभम लता अतुल तिप्पट यांची असिस्टंट जिओलॉजिस्ट पदासाठी निवड झाली आहे. शुभमचे शालेय शिक्षण अस्मिता प्राथमिक शाळेत झ
शुभम तिप्पट असिस्टंट जिओलॉजिस्ट


अमरावती, 20 ऑक्टोबर (हिं.स.)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासनाच्या ग्राउंड वॉटर सर्व्हे अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सी (जीएसडीए) येथे शुभम लता अतुल तिप्पट यांची असिस्टंट जिओलॉजिस्ट पदासाठी निवड झाली आहे.

शुभमचे शालेय शिक्षण अस्मिता प्राथमिक शाळेत झाले. बारावीपर्यंतचे मणिबाई हायस्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण हे चिखलदरा येथील सिपना महाविद्यालयात व एम.एस्सी भुगर्भशास्त्र छत्रपती संभाजी नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ झाले. त्यानंतर नेट व सेट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या. संशोधनासाठी आआयटीआयएएन खडगपूर कलकत्ता येथे शोध कार्य पूर्ण केले. त्याच दरम्यान युपीएससी मेन्स उत्तीर्ण केली. शुभमने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमातून हे यश मिळविले आहे. कुटुंबाच्या संपूर्ण सहकार्य त्याला पदोपदी लाभले आहे. शुभमच्या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत कौतुक होत आहे. अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य सुनील तिप्पट व संगीता तिप्पट यांनी शुभमचे अभिनंदन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande