एकमेकांचे चेहरे न पाहणारे दीपोत्सवात एकत्र - नवनीत राणा
अमरावती, 20 ऑक्टोबर (हिं.स.) लोकसभेत ते जिंकले तर लोकशाही जिवंत आहे. विधानसभेत ते हारले तर लोकशाहीची हत्या, संविधानाची हत्या असं म्हणाचंय. लोकसभेत निवडून आले तेव्हा जिवंत असणारी लोकशाही चार महिन्यातच कशी मरू शकते? असं विधानं करून विरोधक जोक करत अ
एकमेकांचे चेहरे न पाहणारे आज दीपोत्सव एकत्र साजरा करत आहे  नवनीत राणांची ठाकरे बंधुवर जळजळीत टीका


अमरावती, 20 ऑक्टोबर (हिं.स.)

लोकसभेत ते जिंकले तर लोकशाही जिवंत आहे. विधानसभेत ते हारले तर लोकशाहीची हत्या, संविधानाची हत्या असं म्हणाचंय. लोकसभेत निवडून आले तेव्हा जिवंत असणारी लोकशाही चार महिन्यातच कशी मरू शकते? असं विधानं करून विरोधक जोक करत असल्याची टीका भाजपा नेत्या नवणीत राणा यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षानं मतचोरी केल्यानंच आपल्याला पराभव पत्करावा लागला असा आरोप, भाजपा नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांनी विरोधी पक्षावर केला.

राज्यातील शेतकरी आणि लाडक्या बहिणींना मदत कशी करता येईल? पायाभूत सुविधा कशा वाढवता येईल? यावर खरं तर विरोधकांनी लक्ष देणं गरजेचं होतं. पण या उलट ते मतचोरी कशी आणि कुठे झाली? यासारख्या विविध विषयावर बोलतात. काँग्रेसनं गेल्या सत्तर वर्षात यापेक्षा वेगळे काही केलं नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

जोपर्यंत निवडणूक याद्यांमधील घोळ निस्तरले जात नाहीत, तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. याबाबत त्या म्हणाल्या, विरोधकांनी यापूर्वीही निवडणूक आयोगाकडे अनेक मागण्या आणि इशारे दिले आहेत. पण, प्रत्यक्षात जनतेसाठी काहीही ठोस काम केलं नाही.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीकडून सातत्यानं मत चोरी होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीवर पलटवार केला. लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबतही नवनीत राणा यांनी स्पष्टपणे सांगितलं की, निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतांची चोरी झाली. त्याचा फटका मलादेखील बसला. त्यामुळेच माझा पराभव झाला.

पतीला मंत्री पद न मिळाल्याचंं दुःख - पती, आमदार रवी राणा यांना मंत्री पद मिळणार अशी आशा होती. पण ते मिळालं नाही. पण ते दुःख मात्र असं आहे की कोणाला सांगू शकत नाही. मंत्री पदासाठी वर्णी लागेल म्हणून त्यांनी बहुधा जॅकेट शिवली असावीत. त्यापैकी एक त्यांनी आज घातले असेल, असं मिश्किलपणे त्यांनी म्हटलं.

चेहरेसुद्धा पाहत नव्हते - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडण्यापूर्वी मनसे आणि शिवसेना (यूबीटी) एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्यावरून माजी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, मजबुरीचं नाव ठाकरे परिवार’ आहे. आज उद्धव आणि राज ठाकरे मजबुरीत एकत्र आले आहेत. जर बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाच्या वेळी हे दोघे एकत्र आले असते, तर म्हणता आलं असतं की ही विचारांची एकजूट आहे. पण, आता जेव्हा सत्ता हातातून गेली, तेव्हा जे एकमेकांचे चेहरेसुद्धा पाहत नव्हते. ते आज दीपोत्सव एकत्र साजरा करत आहेत, टोला माजी खासदार राणा यांनी लगावला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande