सोलापूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)सोलापूर शहर-जिल्ह्याच्या भाजपमध्ये गटबाजीला ऊत आला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आ. सुभाष देशमुख आणि त्यांचे पुत्र मनिष देशमुख यांनी आ. विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी सोलापूर दौऱ्याच्या दुसऱ्याचदिवशी दोन्ही एकत्रित आले. याआधी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळी दोन्ही देशमुख एकत्रित आले होते. आ. सुभाष देशमुख यांनी आ. विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट दिली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा देशमुख पितापुत्रांनी आ. विजयकुमार देशमुखांच्या घरी सदिच्छा भेट दिली आहे. यावेळी माजी नगरसेवक शिवानंद पाटील यांची उपस्थिती होती.या भेटीत राजकीय घडामोडींसह सामाजिक विषयांवरही सविस्तर चर्चा झाल्याची माहिती भाजप नेते मनीष देशमुख यांनी दिली. भेटीचे फोटो मनीष देशमुख यांनी स्वतःहून सोशल मीडियावर पोस्ट केल्याने राजकीय तर्क वाढले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड