मुक्त विद्यापीठात केंद्रीय युवक महोत्सवातील विजेत्या ४८ विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड
नाशिक, 22 ऑक्टोबर (हिं.स.) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय युवक महोत्सव उत्साहात झाला. यात अमरावती विभागाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा
मुक्त विद्यापीठात केंद्रीय युवक महोत्सवातील विजेत्या ४८ विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड


नाशिक, 22 ऑक्टोबर (हिं.स.) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय युवक महोत्सव उत्साहात झाला. यात अमरावती विभागाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा आविष्कार असलेल्या या महोत्सवात विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे, अमरावती, नांदेड व कोल्हापूर या आठही विभागीय केंद्रांतील राज्यभरातील ४१ विद्यार्थी व ६३ विद्यार्थिनी, असे १०४ जण सहभागी झाले होते. त्यातील विजेत्या ४८ विद्यार्थ्यांची दि. ५ ते ९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या आंतरराज्य युवक महोत्सव 'इंद्रधनुष्य-२०२५' साठी निवड करण्यात आली आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन, संचालक डॉ. जयदीप निकम, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्राचे प्रमुख डॉ. दयाराम पवार यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande