अकोला, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। आज देशभरात स्नेह आणि प्रेमाचा सण भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने राजकीय क्षेत्रातही भावाबहिणीच्या नात्याचा उत्सव रंगत आहे. अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अमोल मिटकरी यांच्या नेतृत्वाखाली निवासस्थानी मिटकरी यांनी आपल्या बहिणींसोबत भाऊबीज साजरी केली.या वेळी बहिणींनी आमदार मिटकरी यांना ओवाळून त्यांच्या यशस्वी राजकीय वाटचालीसाठी आणि आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, माध्यमांशी बोलताना आमदार मिटकरी म्हणाले, “राज्य सरकार लाडक्या बहिणीच्या पाठीशी आहे, आणि माझ्या बहिणींनीही हे सरकार टिकावं अशी मनोकामना व्यक्त केली आहे.तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या एकत्र येण्यावर भाऊबीजेच्या निमित्ताने भाष्य करताना त्यांनी राजकीय दृष्टिकोनातून ते एकत्र नसले तरी कौटुंबिक दृष्ट्या एकत्र असल्याचं ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे