चंद्रपुरात भाऊबीज उत्साहात साजरी
चंद्रपूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। दिवाळीमधील सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणजे भाऊबीज. या सणामुळे हे नाते अधिकाधिक घट्ट होत जाते. बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक असणारी भाऊबीज गुरुवारी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. चंद्रपुरातही भाऊबीजेचा उत्स
चंद्रपुरात भाऊबीज उत्साहात साजरी


चंद्रपूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। दिवाळीमधील सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणजे भाऊबीज. या सणामुळे हे नाते अधिकाधिक घट्ट होत जाते. बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक असणारी भाऊबीज गुरुवारी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. चंद्रपुरातही भाऊबीजेचा उत्साह दुणावलेला दिसुन आला.

दिवाळीमध्ये बलिप्रतिपदा अर्थात पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. बुधवारी घरोघरी पाडवा जल्लोषात साजरा झाला, तर गुरूवारी भाऊबीजही उत्साहात साजरी झाली. भाऊबीजेच्या दिवशी भावाची पूजा करण्यामागे फार मोठा अर्थ आहे. बीजेचा चंद्र हा कर्तृत्वाचा प्रतिक मानला जातो. आपला भाऊ हा बीजेच्या चंद्राप्रमाणे कर्तृत्ववान व्हावा, अशी सदिच्छा बहिणीच्या मनात यामागे असते. भाऊबीजेला भाऊ बहिणीच्या घरी जाऊन ओवाळणी म्हणून भेटवस्तू देतो. यावेळी बहिणही भावाला औक्षण करून भेटवस्तू देते अशी प्रथा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande