अकोला, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर-दर्यापूर महामार्गावर पायटांगी गावाजवळ आज तीन वाहनांचा विचित्र आणि भीषण अपघात झाला. कार, ऑटो आणि ट्रॅक्टर या तिन्ही वाहनांच्या धडकेत एक व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.अपघाताची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली आहे.दरम्यान, जखमींना तातडीने मूर्तिजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे