छत्रपती संभाजीनगर, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सिंदोन येथे दोन नवीन वर्ग खोल्यांचे उद्घाटन राज्याचे पालकमंत्री संजय शिरससाटयांच्या हस्ते करण्यात आले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सिंदोन येथे दोन नवीन वर्ग खोल्यांचे उद्घाटन उत्साहात पार पडले.या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. “या शाळेचे रूपांतर लवकरच एका मोठ्या, आधुनिक शाळेत होईल. शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ती सर्व मदत आम्ही निश्चित करू. तसेच, लवकरच अजून दोन नवीन वर्ग खोल्या बांधण्याचे नियोजन असल्याची माहिती देण्यात आली.परिसर निसर्गरम्य व प्रेरणादायी असून, लहान मुलांच्या शिक्षणासाठी उत्तम वातावरण निर्माण होत आहे. शाळा व्यवस्थापन, शिक्षकवर्ग व ग्रामस्थ यांचे सहकार्य आणि उत्साह उल्लेखनीय राहिले.
----------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis