अकोल्यातील कुख्यात गुन्हेगार मिथुन उर्फ मॉन्टीला जामीन मंजूर
अकोला, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पोलीस रेकॉर्डवरील अकोल्यातील कुख्यात गुन्हेगार मिथुन उर्फ मॉन्टी सुधाकर इंगळे याला देशी कट्टा, जिवंत काडतूस, लोखंडी तलवार व कत्ता यांसह अटक केली होती. दरम्यान या प्रकरणी आता मिथुन उर्फ मॉन्ट
प


अकोला, 22 ऑक्टोबर (हिं.स.)।

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पोलीस रेकॉर्डवरील अकोल्यातील कुख्यात गुन्हेगार मिथुन उर्फ मॉन्टी सुधाकर इंगळे याला देशी कट्टा, जिवंत काडतूस, लोखंडी तलवार व कत्ता यांसह अटक केली होती. दरम्यान या प्रकरणी आता मिथुन उर्फ मॉन्टीला अकोला येथील कनिष्ठ न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे..

मिळालेल्या माहितीनुसार, 19 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे शहरातील चिवचिव बाजार परिसरात छापा टाकला होता. या कारवाईत आरोपीकडून एकूण 31 हजार 300 रुपयांचा अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. आरोपी मिथुन उर्फ मॉन्टी कडे सदर शस्त्र संबंधी परवाना नव्हता. गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने तो ती बाळगत असल्याचं एफआयआर मध्ये नमूद होतं. या प्रकरणी आरोपीला अकोला येथील न्यायालयासमोर नेण्यात आले. दरम्यान आरोपीचे वकील यांनी पोलिसांनी केलेले आरोपावर प्रभावी युक्तिवाद केला. अकोला येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी श्रीमती पूनम जमाईवार यांच्या न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी ॲड.सुमित महेश बजाज यांनी प्रभावी युक्तिवाद केल्याने आरोपीला जामीन मंजूर झाला आहे. तर ॲड वर्षा सदार, ॲड अजय भारसाकळे, ॲड श्रीरंग महाजन यांनी सहकार्य केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande