भाजपा आ. सुरेश धस यांची वंचित, शोषित आणि भटके-विमुक्त बांधवांसोबत दिवाळी साजरी
बीड, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी आज वंचित, शोषित आणि भटके-विमुक्त बांधवांसोबत दिवाळी सण साजरा केला. यासंदर्भात बोलताना आमदार म्हणाले की, दिवाळी पाडव्यानिमित्त वडिलांनी सुरू केलेली ही परंपरा यंदाही अत्यंत
अ


बीड, 22 ऑक्टोबर (हिं.स.)।

आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी आज वंचित, शोषित आणि भटके-विमुक्त बांधवांसोबत दिवाळी सण साजरा केला.

यासंदर्भात बोलताना आमदार म्हणाले की, दिवाळी पाडव्यानिमित्त वडिलांनी सुरू केलेली ही परंपरा यंदाही अत्यंत उत्साह आणि आत्मीयतेच्या वातावरणात निवासस्थानी पार पडली. समाजातील वंचित, शोषित आणि भटके-विमुक्त बांधवांसोबत दिवाळी सण साजरा करताना सर्वत्र आनंद आणि आपुलकीचे वातावरण अनुभवायला मिळाले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्यात समाजातील अनेक घटक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. या निमित्ताने उपस्थित बांधवांशी संवाद साधला.

समाजातील शोषित-वंचित घटकांच्या जीवनात आनंद आणि उन्नतीची पहाट यावी, त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलावे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील आहे. असे ते म्हणाले

स्व. रामचंद्र दादा धस यांनी सुरू केलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि मानवी मूल्यांचा संदेश देत, या परंपरेतून समाजातील प्रत्येक घटकात प्रेम, एकोपा आणि आनंदाचा दीप प्रज्वलित करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande